तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद सत्तांतरा नंतरही खासदार संभाजीराजे यांचेकडे राहण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे
खासदार संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहू महाराज यांच्या घरांचे वंशज आहेत खासदार झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील पुरातत्व विभागा शी संपर्क ठेवून रायगड विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत राज्यात सत्तांतर झाले असले तरी महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी निवडण्यात येणार असले तरी संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे
नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच निर्णय घेताना आम्ही रायगड विकास प्रधिकरण विकास कामांचा 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता तो प्रस्ताव मंजूर केला आहे यावरून त्यांचे किल्ल्यावरील प्रेम दिसून येते विविध विभागांचे अनेक प्रस्ताव असताना त्यांनी किल्ले रायगडच्या विकासास प्राधान्य दिले त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करत असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले