बानुगडे सर शिवसेनेत खांदेपालट करा व पक्षाला आलेली मरगळ झटका

38
Adv

सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आलेली दिसते कोणताही जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाप्रमुख तालुकाध्यक्ष कुठेच सक्रीय झालेल्या दिसत नाहीत त्यामुळे बानगुडे सर शिवसेनेत खांदे पालट करा व युवावर्गाला जिल्ह्याच्या ठिकाणी बसवा ही मागणी शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून होत आहे

सातारा जिल्ह्याने शिवसेनेला हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या रूपाने खासदार दिला त्यानंतर आक्रमक चेहरा म्हणून माजी जिल्हाप्रमुख नरेंद्रजी पाटील यांनी शिवसेनेत जीव आणला शिवसेनेची सत्ता नसताना सेना जिवंत ठेवली आता सत्ता असून शिवसेनेतील जिल्हा प्रमुख पदाधिकारी कुठे सक्रिय झालेले दिसत नाहीत जिल्ह्याला दोन जिल्हाप्रमुख आहेत एक चंद्रकांत पाटील व दुसरे पाटणचे माऊली शेलार , शेलार यांनी साताऱ्याचा कधी तोंड पाहिले नाही अशे दिसते जुना जनता शिवसैनिक त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून हे ओळखणार नाही त्यांना पाटण तालुका पूर्ण जिल्हा आहे की काय असे वाटते त्यामुळे शेलार साहेब जरा पाटण तालुयातुन बाहेर पडा व जिल्ह्यात लक्ष घाला सेनेची अवस्था बघा सत्ता नसताना एवढे कार्यकर्ते होते तेवढे आज सत्ता असताना दिसत नाहीत जिल्ह्यातील निष्ठावंताना कधीही सेनेने वर येऊ दिले नाही बानुगडे सर तुम्ही जिल्ह्याचे सेनेचे वरिष्ठ नेते आहात तुम्ही तरी लक्ष घाला व आलेली मरगळ झटका नाहीतर कार्यकर्ता नसल्याची सल कायम मनात राहील

आत्ताचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व शेलार यांची काय ठोस भूमिका होती निवडणुकांमध्ये हे तरी त्यांनी स्पष्ट करावे नुसते पक्षाचे नेते आले की फोटोसाठी पुढे पुढे करायला हे सगळे पुढे असतात योगायोगाने मानचे युवा नेते शेखर भाऊ गोरे हे सुद्धा आक्रमक आहेत त्यांचाही विचार सेनेने करावा आता जिल्ह्यात एक नाहीतर दोन आमदार आहेत सेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी हीच सदिच्छा नाहीतर बऱ्याच शिवसैनिकांची सेनेत अवस्था काय झाली हे जिल्ह्यातील जुन्याजाणत्या प्रमुखांना चांगलेच माहित आहे

बानगुडे सर तुमच्या कडून जिल्ह्याला खूप अपेक्षा आहेत की तुम्ही काहीतरी चांगले कराल परंतु पदाधिकारी कशात गुंतलेले आहेत हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे पक्षाच्या नावावर गुळांबा मिळाला की गप बसायचं कोण कुठे गुळांबा घेते हे तुम्हाला सगळे माहिती बऱ्याच वेळा तुमच्या कानावर सुद्धा घातले आहे निष्ठावंत शिवसैनिक मात्र झेंडा घेऊन पक्षासाठी एकनिष्ठ राबत असतो आणि सत्ता आली की मात्र तो लांब कुठेतरी गेलेला असतो आताचे पालकमंत्री होते काय नव्हते काय अशी अवस्था होती तुम्हीच तर जिल्ह्यातील सेनेचे खरे पालकमंत्री आहात आतातरी सत्तेचा उपयोग खऱ्या शिवसैनिकांसाठी व्हावा व जिल्ह्याला खरंच आक्रमक युवा जिल्हाप्रमुख मिळावा अशी अपेक्षा जुन्याजाणत्या शिवसैनिकांकडून होत आहे जय महाराष्ट्र

Adv