विजय काटवटे यांनी स्वच्छ सर्वेक्षणची टीम कधी आली गेली कळलेच नाही. प्रशासनाने नगरसेवकांना कल्पना दिली असती तर योग्य नियोजन करता आले असते. फक्त स्वच्छ सातारा करूया अशी घोषणा करुन नंबर मिळणार नाही. कराड सारख्या शहराला चांगला नंबर मिळत असेल ते आपण कुठे कमी पडलो हे तपासावे लागेल.
आरोगय निरीक्षकांच्या हेकेखोरपणा मुळे व लक्ष्मी दर्शनामुळे आरोग्य विभागाची तीन वर्षापासून अब्रू चव्हाट्यावर निघत आहे दुर्दैवाने सातारा विकास आघाडीच्या सभापतींना त्याला तोंड द्यावे लागत आहे मात्र या सर्रवा मागे निरीक्षकच कारणीभूत असून सातारा विकास आघाडी च्या सर्व नगरसेवकांनी त्यावर ठोस उपाय करून संबंधित निरीक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे संबंधित नगरसेवकांना आरोग्य निरीक्षक चुकीच्या माहिती देऊन गोल उत्तर देण्याचा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे गेंड्याची कातडी घातल्यासारखे निरीक्षक व त्यांचे वरिष्ठ अधिकारी असे वागतात आव जावो घर तुम्हारा अशीच अवस्था त्यांनी आरोग्य विभागाची करून ठेवली मुख्याधिकारी यांचा त्यांच्यावर अंकुश नाहीच एक अधिकारी तर मला जिल्ह्यातील मंत्र्यांचा वरदहस्त आहे अशाच रुबाबात वावरत असतो त्यांना माहिती नसावं की छत्रपतींना मानणारे सातारा शहर त्या पालिकेत हे काम करतात
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वतः लक्ष्मी चे दर्शन करून घेण्यात सर्व निरीक्षकांनी धन्यता मानल्याने त्यांनी कोणत्याही नगरसेवकाला माहिती दिली नाही अशी माहिती नगरसेवकांने खाजगीत सांगितले