मंगळवारतळे सातारा येथे योगेश देवकर नावाचा इसम फिरत असुन त्याने काळे रंगाचा टिशर्ट व काळे रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. त्याचे जवळ अग्नीशस्त्र असुन त्यास ताब्यात घेवुन कारवाई करा असा तोंडी आदेश दिला. मंगळवार तळे, सातारा येथे आम्ही गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार सापळा रचुन थांबलो असताना मिळाले बातमीच्या वर्णनातील काळे रंगाचा टि शर्ट व काळे रंगाची जीन्स परिधान केलेला एक संशयीत इसम येत असल्याचे पाहुन आम्ही पोलीस स्टाफने त्यास थांबवीले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदारानी त्यास पकडून ताब्यात घेतले. त्यावेळी गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार
यांनी त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून त्यास त्याचे नाव गाव
विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश भिमराव देवकर वय – ३० वर्षे, रा.२३ मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा असे
असल्याचे सांगितले.त्यावेळी सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल
मिळून आले. त्याचे जवळ मिळून आलेल्या पिस्टल बाबत त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगणेचा परवाना आहे काय
याबाबत त्यास विचारले असता त्याने त्याचे जवळ कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
अश्या प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधीकारी/अंमलदारानी सदर इसमासह अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस गुन्हयाचे कामीताब्यात घेवुन त्याप्रमाणे शाहुपुरी पोलस स्टेशन येथे गु.र.न.20 /2024 शस्त्र अधिनीयम कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदकरणेत आला आहे.सदरगुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे हे करीत आहेत.अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी/अंमलदार यांनी अग्नीशस्त्र व एक जिवंतकाडतुसासह 65,200/-रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री.धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके,मनोज मदने,निलेशकाटकर,जोतीराम पवार,महेश बनकर,अभय साबळे, सचिन पवार,स्वप्नील सावंत,सुमित मोरे,सुनिल भोसले यांनी केली आहे.