आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांचे बद्दल केलेल्या आक्षेपार्य विधानाबाबत त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे सातारा शहर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप जगताप यांच्याकडे करण्यात आली, या विषयी लेखी तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली आहे,
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की प्रभू श्रीराम हे समस्त भारतवासी यांचे आणि हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत. माता पिता यांचा शब्द प्रमाण मानून अखंड चौदा वर्षे सश्रम वनवास व्यथित करून ज्यांनी जीवनाचा आदर्श निर्माण केला अशा प्रभू श्रीराम बद्दल प्रत्येक हिंदू धर्माच्या मनात अत्यंत आदर व सन्मानाचा श्रद्धेचा भाव आहे.
अशा जीवनाचा आदर्श प्रमाण म्हणून सिद्ध असणाऱ्या देवाधिकांचे नाव एकेरी शब्दात घेऊन त्यांनी वनवासी जीवन जगत असताना शिकार करून मांसाहार केला वगैरे अक्षम्य विधाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केली आहेत
येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ घातली आहे. सदर पावन सोहळा समस्त भारत देशातील हिंदू धर्मीय पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी दशकांनुदषके वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सदर लोकप्रतिनिधीने पुरोगामी चेहरा दाखवून केलेले विधान हे समस्त हिंदू धर्मीयांचे व विशेषतः हिंदू धर्माबद्दल आमच्या मनामध्ये असणारी आस्था दुखावणारे असे आहे.
तक्रारीत सदर आमदार लोकप्रतिनिधीने केलेले विधान हे जाणीवपूर्वक व पूर्ण विचारांती समाजामध्ये द्वेष अगस्ते जातीय तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने केलेले आहे अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे आणि सदर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या अनुषंगाने आयपीसी कलम 294 504 506 अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन सत्वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली