सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री जितक्या संयमाने संसार सांभाळते तितक्याच करारीपणे ती उद्योग व्यवसायातही यशस्वी होऊ शकते. समाज व्यवस्थेचा स्त्री हा मजबूत कणा आहे तिला व्यासपीठ मिळाल्यास उद्योग क्षेत्रातही ती उंच भरारी घेण्याची क्षमता ठेवते असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केले.विलासपूर येथे खासदार उदयनराजे भोसले समर्थक व प्रगतशील उद्योजक संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राजमाता कल्पनाराजे भोसले बोलत होत्या
यावेळी माजी नगराध्यक्ष व मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष रंजना रावत ,माजी नगराध्यक्ष स्मिताताई घोडके,अश्विनी पुजारी, गीतांजली कदम,अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे रघुनाथ मोटे, संयोजक संग्राम दादा बर्गे,संजय बुवा सूर्यवंशी, किरण आप्पा नलवडे, आबा शिंदे, एस एस सुतार, उदय मराठे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते
या महोत्सवामध्ये 80 हून अधिक महिलांनी बचत गटाच्या स्टॉल्सने सहभाग घेतला आहे या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत राजमाता कल्पनाराजे भोसले म्हणाल्या स्त्री सक्षमीकरण म्हणजे कुटुंबाचा नव्हे तर समाजाचा विकास करते .तिच्यामध्ये संसार सांभाळण्यात इतकीच उद्योग सांभाळण्याची ही कर्तव्यदक्षता आणि तत्परता आहे तिला संधी मिळाल्यास ती यशस्वी उद्योजिका होऊन अर्थकारणाला ही चालना देऊ शकते . विलासपूर परिसरातील महिला उद्यमशील असून त्यांच्या माध्यमातून बचत गट सक्रिय झाले आहेत आणि येथील अर्थकारणाला त्यांच्या माध्यमातून गती मिळत आहे ही बाब कौतुकास्पद आहे .खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीच या भागातला पायाभूत सुविधा देण्यासाठी आग्रह धरला त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विकासाची कामे होतात . मात्र त्यांचे हे यश संघर्ष पूर्ण आहे साताऱ्याच्या राजघराण्यावर येथील नागरिकांनी नेहमीच प्रेम केलेले आहे .या बचत गटाच्या प्रदर्शनाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत अशा शब्दात राजमातांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
प्रदर्शनाचे मुख्य संयोजक संग्राम बर्गे म्हणाले हा भाग नव्यानेच हद्दवाढीमध्ये आलेला आहे या भागातून खासदार उदयनराजे भोसले यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्य देऊ, महिला सक्षमीकरणासाठी उदयनराजे यांनी नेहमीच पुढाकार घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना केलेल्या आहेत गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव त्याचाच एक भाग आहे .महिला बचत गटांच्या उत्पादनांना एक व्यासपीठ देणे आणि त्या उत्पादनांना एक बाजारपेठ म्हणून देणे ही उदयनराजे यांची संकल्पना या महोत्सवाच्या माध्यमातून साकारली जात आहे .राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे कायमच आम्हाला मार्गदर्शन लाभत असते राजमाता कल्पना राजे यांच्या उपस्थितीबद्दल संग्राम बर्गे यांनी त्यांना धन्यवाद दिले
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी सुद्धा या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि या भागातील आगामी नगरसेवक उदयनराजे समर्थक संग्राम बर्गे हेच आहेत असे त्यांनी जाहीर करून टाकले संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आदरणीय राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेटी देऊन महिलांशी संवाद साधला आणि त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या