Monday, May 4, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City ते पत्रे घेणार कोणाचातरी जीव.. पालिकेने कारवाई करावी

ते पत्रे घेणार कोणाचातरी जीव.. पालिकेने कारवाई करावी

251
Adv

शुक्रवार पेठेतील बोधे हॉस्पिटल समोरील एका बिल्डरने बांधकामासाठी पत्रे लावले असून एक एक दोन पत्ते पूर्ण रस्त्याच्या लगत असल्याने हे पत्र कोणाची तरी जीव घेणार हे समोर दिसत असून या बिल्डर लॉबीत कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्यानेच अशा प्रकारचे धाडस केले गेले असल्याचे बोलले जात आहे

शुक्रवार पेठेतील चौकातून थोडं पुढे गेलं की बोधे हॉस्पिटलच्या समोरच बिल्डिंगचे काम चालू असून गडकरआळी येथून शुक्रवार पेठ कडे येणाऱ्या रस्त्यावरच बिल्डरने रस्त्यालगतच पत्रे लावलेत या पत्र्याच्या मुळे वाहन चालकांना समोरून येणाऱ्या वाहन दिसत नसून हे पत्रे नक्कीच कोणाच्यातरी जीव घेणार असे चित्र दिसत आहे

सातारा पालिकेत भाजपची सत्ता आहे दोन्ही राजेंच्या प्रभागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या बिल्डरवर राजकीय वरदहस्त कोणाचा तरी असल्यानेच असे धाडस केले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले सातारा पालिकेने सर्वे करून हे पत्र तातडीने काढण्यास सांगावे अशी मागणी नागरिक करत आहेत

Adv