Wednesday, May 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City लोखंडी जाळ्याने सातारकर नागरिक त्रस्त

लोखंडी जाळ्याने सातारकर नागरिक त्रस्त

369
Adv

व्यापारी व दुकानदारांना सकाळी उठल्या उठल्या गिऱ्हाईकांपेक्षा दुकानासमोर जाळ्या टाकण्याची घाईगडबडीत जास्त असल्याचे चित्र सध्या साताऱ्यात पाहायला मिळते या जाळ्यांमुळे वाद विवाद होतात व सर्वसामान्य सातारकर यांची गाडी वाहतूक विभाग उचलून नेते त्यामुळे या जाळ्यांपासून पालिका पदाधिकारी सातारकरांना मुक्त करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे

व्यापारी असो दुकानदार असो प्रत्येकाच्या दुकानासमोर लोखंडी जाळ्याने रस्ता हा व्यापलेला असतो काही दुकानांसमोर तर भले मोठे जाळ्या टाकून जागाच आरक्षित केलेले असल्याचे चित्र सदैव व्यापारी व दुकानांच्या समोर पाहायला मिळते याकडे पालिका प्रशासन काही कारवाई करत नाही त्यामुळे पालिका पदाधिकारी व प्रशासनाची त्याला मुख संमती आहे की काय असेच शंका उपस्थित होत आहे

पालिकेचे पदाधिकारी अतिक्रमण मोहीम काढण्यास जोर देत असून सर्वसामान्यांना भुर्दंड बसवण्यापेक्षा व्यापारी व दुकानदारांना भुर्दंड बसवणार का असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत असून सातारा पालिकेने या जाळ्यांचा सर्वे करून जाळ्यांपासून सातारकर नागरिकांना मुक्त करावे अशीच अपेक्षा नागरिक करत आहेत

Adv