साताऱ्याच्या मातीला शौर्याची, इतिहास घडवण्याची परंपरा आहे. तीच परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी शाहूनगरी फौंडेशनच्यावतीने महाराणी येसूबाई पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. धैर्या कुलकर्णी हिने तिच्या नावाप्रमाणेच गिर्याहोरण क्षेत्रात कामगिरी केलेली आहे. लहान वयात गिर्यारोहरणाचा छंद जोपासत जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर तिने शिखरे पादाक्रांत केली आहेत. तिला मिळालेला हा पुरस्कार तिच्या जिद्द आणि कतृर्त्वाचा एकप्रकारे सन्मानच आहे, असे मत शाहूनगरी फौंडेशनच्या अध्यक्ष वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शाहूनगरी फौंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांसाठी देण्यात येणारा दुसरा महाराणी येसूबाई पुरस्कार साताऱ्याच्या ‘अंजिक्य कन्या’ धैर्या विनोद कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फौंडेशनच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले, विश्वस्त नगरसेवक शंकर माळवदे, सचिव सुशांत मोरे, कल्याण राक्षे, परीक्षक महेश घाग, अमर कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.
धैर्या कुलकर्णी हिला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, २५ हजार रुपये रोख असा पुरस्कार मान्यावरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान (कै.) चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या राजधानी स्किट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या स्पर्धेत रंगपंढरी नाट्य संस्था, पुण्याच्या गेला भारत कुण्या गावा यास प्रथम, वैभवदीप नाट्य संस्था, सोलापूरच्या पोटात दुखतंय यास द्वितीय तसेच समर्थ नाट्य संस्था, साताऱ्याच्या डायपर यास तृतीय तसेच थिएटर नाट्यसंस्था सोलापूरच्या प्रपोजल यास चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. याबरोबरच नवीन मराठी शाळेच्या नारी सर्वात भारी यास प्रोत्साहनात्मक पारितोषिक देण्यात आले. पुरुष अभिनय प्रथम -रोहित लगाडे, सोलापूर, व्दितीय महेश चव्हाण, सातारा, तृतीय – प्रतिक तांदळे, चिंदबरम अक्कल, सोलापूर, उत्तेजनार्थ – हणमंत शिंदे, सातारा, देवदत्त घोणे, सातारा, स्त्री अभिनय- प्रथम – रुचा पवार,पुणे, व्दितीय – जान्हवी हरगुडे,पुणे, तृतीय सई दरेकर- सोलापूर, उत्तेजनार्थ -वीरांशी घाडगे, सर्वोत्कृष्ट लेखक – प्रमोद यादव, पुणे, सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक माळवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजित जाधव यांनी स्कीट स्पर्धेच्या निकालाचे वाचन केले. के. महेश, अमर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सुशांत मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सातारकर उपस्थित होते.






