Thursday, August 13, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे साताऱ्यात स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे साताऱ्यात स्वागत

72
Adv

भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जी आठवले यांचे सातारा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विधान परिषद आमदार धैर्यशील कदम आणि भाजपचे लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी आठवले यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

यावेळी विविध सामाजिक, राजकीय तसेच सातारा जिल्ह्यातील विकासाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. रामदास आठवले यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आठवले यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Adv