करंजे येथील भैरवनाथ देवस्थानच्या मालकीची सर्वे नंबर 190/1 व 2 या जागेत संतोष इंदलकर यांच्याकडून बेकायदेशीर बांधकाम सुरू असून मुख्यमंत्री तसेच प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने तक्रारदार व गावकरी आताआंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे संबंधित तक्रारदार यांनी सांगितले
सदरची जागा ही देवस्थानची असून ही अधिकृत बिनशेती झालेली नाही तरीही राजकीय बळाच्या जोरावर हे बेकायदेशीर बांधकाम सुरू असून या सदर जागेचा ताबा करंजे ग्रामस्थ यांना मिळावा अशी मागणी ही गावकऱ्यांनी केली असून या जागेचा अनेक वेळा विक्रीचा प्रकार झाला असून संबंधित इंदलकर यांचा या मिळकतीशी काही संबंध नसून तरीदेखील बेकादेशीर बांधकाम उभे राहत असल्याने याला नक्की कोण पाठबळ देतय हे या ग्रामस्थांना कळायला मार्ग नाही त्यामुळे हे संबंधित बांधकाम पालिकेने पाडून ग्रामस्थ न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
सातारा पालिकेतील शहर विकास विभाग कार्यालयामध्ये अनेक वेळा तक्रार दिल्या तरी कारवाई केली गेली नाही त्यामुळे पालिकेच्या शहर विकास विभागावर संशयाची सुई निर्माण झाली आहे






