Thursday, October 15, 2026
spot_img
Home Satara District Phaltan जयश्री भोसलेंच्या दौऱ्याला उदंड प्रतिसाद

जयश्री भोसलेंच्या दौऱ्याला उदंड प्रतिसाद

114
Adv

सातारा जिल्ह्यातील उद्योगपती राजू काका भोसले यांच्या पत्नी जयश्री भोसले या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार नितीन काकांच्या नेतृत्वात वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या माध्यमातून दौरा करत असून या दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे

कोरेगाव तालुक्यातील मूळ नांदगिरीचे असलेले सुपुत्र राजू काका भोसले यांच्या पत्नी जयश्री भोसले या वाठार स्टेशन गटासाठी इच्छुक असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून राजू काका यांच्या पत्नी जयश्री भोसले यांना उमेदवारी मिळाली तर हा विजय एकतर्फी होणार यात तीळ मात्र शंका नाही त्याला कारणही तसेच की राजू काकांचा गेल्या पन्नास वर्षांपासूनचा या भागात असलेला जनसंपर्क

राजू काका यांच्या पत्नी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत या जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या महिला व बालकल्याण सभापती पदाचा व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव असून येणाऱ्या निवडणुकीत जयश्री भोसले भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास वाठार स्टेशन गटातील मतदारांना वाटत आहे

Adv