Friday, August 21, 2026
spot_img
Home Satara District Phaltan राजघराण्याचा वारसा नावाने नाही, संस्कारांनी जपला जातो…!

राजघराण्याचा वारसा नावाने नाही, संस्कारांनी जपला जातो…!

12
Adv

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी,अखंड सौभाग्यवती छत्रपती सईराणीसाहेब यांच्या माहेरचे श्रीमंत नाईक-निंबाळकर राजघराणे हे केवळ एक नाव नाही; तर शतकानुशतके संस्कार, परंपरा, कर्तव्य आणि जनतेच्या विश्वासाची ओळख आहे. युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर

‘आपत्यस्थाने प्रजाजनः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे या राजघराण्याच्या अनेक पिढ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. अशा घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कृत्यांकडे डोळसपणे पाहून आत्मपरीक्षण करावे.
राजकारणात मतभेद असू शकतात; पण इतिहास, संस्कार आणि ज्येष्ठांचा सन्मान यांची पातळी सोडून स्वस्त राजकारण करणे हीच खरी अपरिपक्वता आहे.
रात्री-बेरात्री शहरातून स्टंटबाजी करत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा, सत्याने वागण्याचे धैर्य दाखवा!
माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर महाराज साहेब हे फलटण संस्थानच्या अभिषिक्त राजांचे रक्ताचे वारस आहेतच; त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वोच्च संविधानिक पद भूषविलेले, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
३५ वर्षांच्या अविरत लोकसेवेतून जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास अफवा, विपर्यास किंवा स्वस्त राजकारणाने कधीही ढळणार नाही.
राजकीय वादळे क्षणभंगुर असतात; मात्र नाईक-निंबाळकर राजघराण्याने पिढ्यान्‌पिढ्या कमावलेला जनतेचा विश्वास हा फलटणच्या मातीतील संस्कारांप्रमाणे चिरंतन आहे.
गॅझेटमध्ये नाव जोडता येते; पण राजघराण्याचे संस्कार कागदोपत्री मिळत नाहीत.
नाव कागदावर जोडता येते;
पण वारसा जगावा लागतो…!
श्रीरामनगरी फलटणची संस्कारी माती अधर्म आणि दुष्प्रवृत्तीला फार काळ थारा देत नाही. येथील जनतेच्या मनात स्वाभिमान, संस्कार आणि सत्याची ज्योत आहे.
अधर्म कितीही आक्रमक झाला, तरी अखेरीस विजय सत्याचाच होतो!
जय श्रीराम! 🙏🏻
#आम्हीश्रीमंतप्रेमी म्हणत युवराज अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सोशल मीडिया द्वारे दिले उत्तर ✍️

Adv