Monday, June 22, 2026
spot_img
Home Satara District Phaltan रणदुलाबादच्या पाण्यासाठी जिल्हाध्यक्ष सरसावले

रणदुलाबादच्या पाण्यासाठी जिल्हाध्यक्ष सरसावले

116
Adv

कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद या गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंततीव्र स्वरुपात भीषण समस्या निर्माण
झालेली असून कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील टोकाचे गाव असून दुष्काळी पट्ट्यात मोडले आहे सध्या गावी पिण्याचे पाणी ८ ते १० दिवसातून एकदा येत आहे सध्या पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था उरलेली नाही

सर्व विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत ही परिस्थिती गेले अनेक वर्षे ग्रामस्थांना त्रासदायक झालेली आहे तसेच पंचक्रोशीतील सर्व गावांची नांदवळ धरणातून पिण्याच्या पाण्याची
कायमस्वरूपी सोय झालेली आहे रणदुल्लाबादगावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज पर्यंत झालेली नाही तरी नांदवळ धरणातून पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी केली

पाण्यावरून बरेच राजकारण घडत असते मात्र राजकारण सोडून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी घेतलेली भूमिकेचे स्वागत केले असून जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले

राष्ट्रवादीचे आमदार मात्र पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट असताना गायप असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते ज्या मतदारांनी निवडून दिले त्यांना दीड वर्षातच आमदार यांनी वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येते

Adv