वाई तालुक्यातील कळंभे गावाच्या विकासाला नवी गती मिळणार असून, समृद्ध ग्रामपंचायत कळंभे व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तब्बल ४६ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या विविध ११ विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील यांच्या निधीसह पंचायत समिती सदस्या राणीताई पवार यांच्या निधीतून, तसेच वित्त आयोग, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल प्राप्त बक्षीस रक्कम आणि सरपंच-उपसरपंच मानधनातून या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्यास खासदार नितीनकाका पाटील, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददादा शिंदे, जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितदादा वीर, वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत उर्फ भैय्या डोंगरे, उपसभापती वर्षाताई जगताप, पंचायत समिती सदस्या राणीताई पवार, शैलेशदादा सकपाळ, हर्षाताई फरांदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींचा निधी, शासनाच्या योजना आणि ग्रामपंचायतीच्या स्वनिधीचा प्रभावी वापर करून ११ विकासकामांना मूर्त स्वरूप देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने मिळवलेल्या तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाच्या बक्षीस रकमेसह सरपंच व उपसरपंचांच्या मानधनाचाही गावविकासासाठी विनियोग करण्यात आला आहे. आदर्श सरपंच तथा राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच नीलम शिवथरे, राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच शकुंतला चव्हाण आणि राष्ट्रीय सक्षम व उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी रघुनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कळंभेने विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.
Home Satara District Wai खा नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत कळंभेत ४६.७५ लाखांच्या ११ विकासकामांचे भूमिपूजन!






