या तक्रारींच्या अनुषंगाने समितीने संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. तक्रारदारांनी उपस्थित केलेले मुद्दे, सादर केलेले पुरावे तसेच डॉ. प्रिया शिंदे यांच्याकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे यांची पडताळणी करण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंना लेखी युक्तिवाद आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली.
सर्व कागदपत्रांची आणि पुराव्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर समितीने डॉ. प्रिया शिंदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना पूर्णविराम मिळाला आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गळांडे, उपायुक्त उमेश घाडगे आणि सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी या प्रकरणाचा निर्णय घेतला. दरम्यान, समितीच्या निर्णयाविरोधात तक्रारदारांना दहा दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे.






