Saturday, November 28, 2026
spot_img
Home Satara District Koregaon शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीची चर्चा!

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीची चर्चा!

23
Adv

युवा नेते शेखर भाऊ गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले असून, धनुष्यबाण हाती घेऊन शिवसैनिकांना पक्षवाढीचे आवाहनही केले आहे. मात्र, आज कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शिवसेना संपर्कप्रमुख शेखर भाऊ गोरे यांचा फोटो कुठेही दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी असलेल्या संपर्कप्रमुखांनाच स्थानिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीत स्थान नसल्याचे चित्र समोर आले आहे.
एकीकडे शेखर भाऊ गोरे शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे कोरेगावच्या कार्यक्रमात त्यांचा फोटोच गायब असल्याने शिवसेनेत ३ गट निर्माण झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षवाढीच्या आवाहनानंतर स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव आहे का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
आता या फ्लेक्सवरील फोटोच्या अनुपस्थितीबाबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी काय भूमिका मांडतात आणि संपर्कप्रमुख शेखर भाऊ गोरे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

युवा नेते शेखर भाऊ गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धनुष्यबाण हाती घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले असून, शिवसैनिकांनाही पक्षवाढीचे आवाहन केले आहे. मात्र, आज कोरेगाव येथे आयोजित विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शिवसेना नेते शेखर भाऊ गोरे यांचा फोटो कुठेही दिसत नाही. निदान शिवसेना नेते म्हणून तरी त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे अपेक्षित होते. मात्र, निमंत्रण आणि फ्लेक्सवरील फोटो या दोन्ही बाबींचा अभाव दिसत असल्याने कोरेगावातील शिवसेनेत ३ गट निर्माण झाले आहेत का? पक्षवाढीचे आवाहन करणाऱ्या नेत्यालाच स्थानिक कार्यक्रमात डावलले जात आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Adv