Sunday, November 29, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District उदयदादा काटकसरीचा वारसा जपा बँकेवर नवा बोजा नको!

उदयदादा काटकसरीचा वारसा जपा बँकेवर नवा बोजा नको!

127
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार करताना माजी मंत्री स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर (काका) आणि माजी खासदार लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांनी नेहमीच बँकेच्या हिताला प्राधान्य दिले. बँकेच्या तिजोरीवर विनाकारण आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेत त्यांनी काटकसरीचा कारभार केला. मात्र, सध्या काही सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी काही संचालकांकडे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बँकेच्या आर्थिक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्यास बँकेच्या तिजोरीवर विनाकारण आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या बँकेचा पैसा अनावश्यक बाबींवर खर्च होणे योग्य ठरणार नाही.

सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा बँकेत सेवेत येण्याचा आग्रह धरला जात असेल, तर अशा निर्णयामागील नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या पैशातून बँकेचा कारभार चालतो, याचे भान निर्णय घेताना ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी या विषयावर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. वरिष्ठ अधिकारी किंवा काही संचालकांकडून दबाव अथवा विनंती केली जाऊ शकते; मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार चेअरमन म्हणून तुमच्याकडे आहे. काका-तात्या आणि स्वर्गीय छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी जपलेली बँकेची आर्थिक शिस्त कायम राखायची की अनावश्यक खर्चाला दरवाजा उघडायचा, याचा निर्णय आता नेतृत्वाने घ्यायचा आहे.

Adv