स्वीकृत’ नगरसेवकांच्या निवडीसाठी राजकीय लॉबिंग सुरू स्वीकृत साठी मातब्बर महिलेची होऊ शकते निवड?

70
Adv

सातारा पालिकेतही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनुभवी व मातब्बर महिलेची ही निवड होण्याची शक्‍यता असल्याचे विशेष सूत्रांकडून बोलले जाते करोनामुळे या निवडी ऑनलाइन प्रणालीद्वारे होण्याची शक्‍यता आहे याप्रकरणी सर्व चित्र हे मंगळवारी किंवा बुधवारी स्पष्ट होणार असल्याचे समजते

खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशांत आहेरराव यांना संधी दिली होती. नविआने अविनाश कदम तर भाजपने विकास गोसावी यांना संधी दिली होती. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला दि. 7 जुलैला एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यानंतर गोसावी यांनी पक्षाचा आदेश प्रमाण मानून आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता; परंतु साविआ व नविआच्या नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, करोना संक्रमणाच्या काळात स्थायी समिती, विषय समित्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडी करू नयेत, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना दिले होते. याबाबतचे परिपत्रक 27 मार्च रोजी काढण्यात आले होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत हालचाली थंडावल्या होत्या; परंतु दि. 9 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने निवडीबाबतचे आदेश निर्गमित केल्याने इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये एका पालिकेचा अनुभव व मातब्बर महिलेचाही समावेश असल्याचे दिसून येते

सातारा पालिकेत खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. स्वीकृत नगरसेवकपदी विद्यमान सदस्यांना मुदतवाढ द्यायची की, खांदेपालट करायचा याचा निर्णय खासदार साहेब घेणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Adv