सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने हद्दवाढीत आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार नाही.त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, त्यांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शाहुपुरीतील नागरिकांना दिले.
शाहूपुरीचे सरपंच गणेश आरडे यांच्यासह शाहूपुरीतील नागरिकांनी आज सातारा पालिकेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची भेट घेतली.त्यांचे अगोदर निवड झाल्याबद्दल स्वागत केले.नंतर शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या 34 कर्मचाऱ्यांना गेली तीन महिने वेतन दिले गेले नाही.आता दिवाळी आली आहे किमान दिवाळीला तरी त्यांना वेतन पालिकेने द्यावे अशी मागणी त्यांनी केली.उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लगेच या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी श्रीमती भाटकर यांना बोलावून घेतले.त्यांना दिवाळीला शहरात ज्या ग्रामपंचायत आल्या आहेत.त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे,अशा सूचना दिल्या.तसेच नागरिकांना दिवाळीपूर्वी त्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी घेतला पालिकेत सर्व खाते प्रमुख यांची उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी बैठक घेतली.या बैठकीत आढावा घेऊन सक्त सूचना दिल्या.कामे व्यवस्थित करायची नसतील तर आताच टेबल बदला पुन्हा ऐकून घेणार नाही.सातारकर नागरिकांना सेवा मिळाली पाहिजे, असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ठणकावले.