सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची गुरुवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड पालिकेच्या ऑनलाईन सभेत जाहीर करण्यात आली.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः पालिकेत येऊन मनोज शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले . दैनिक सातारानामाने सुरुवातीपासूनच अंदाज वर्तविला होता की पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे विराजमान होणार आज पुन्हा एकदा दैनिक सातारानामाचे वृत्त खरे ठरले
२०१६ साली झालेल्या सातारा नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ. माधवी कदम या निवडून आल्या होत्या. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रारंभी राजू भोसले तद्नंतर सुहास राजेशिर्के ,किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांचेच नाव चर्चेत होते जलमंदिर येथे गेल्या काही दिवसापासून बैठकांचे सत्र गतीमान झाले होते कामाचा अनुभव,उत्तम राजकीय समन्वय आणि करंजे ग्रामीण भागाच्या राजकीय पेरणीसाठी शेंडे यांच्या नावाला आघाडीने सार्वमताने पसंती दिली सकाळी दहा ते बारा नामनिर्देशन पत्र दाखल करणे दुपारी सव्वाबारा वाजता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून अर्ज छाननी आणि त्यानंतर दुपारी पावणे एक वाजता पीठासन अधिकारी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली .
मनोज शेंडे यांनी यापूर्वी सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापतिपदी काम केले आहे. सातारा नगरपालिकेत नगर पालिका प्रशासनाशी उत्तम समन्वय आणि करंजे गावठाणात लोकसंपर्क आणि कामाचा वेगवान झपाटाअसल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी त्यांना उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिल्याचे मानण्यात येते. सातारची हद्दवाढ जाहीर झाली असून सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. हद्दवाढीनंतर 7 नवीन नगरसेवकांची भर पडणार आहे . मनोज शेंडे यांना हद्दवाढीमध्ये समवेत झालेल्या भागावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या भागात सातारा विकास आघाडीची कार्यकक्षा वाढवावी लागणार आहे.
साताऱ्याच्या विकास कामांसाठी आग्रही राहणार :मनोज शेंडे नूतन उपनगराध्यक्ष
साताऱ्याच्या विविध प्रकल्पांचा पाठपुरावा करून ती कामे मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूय नेप्रमाणे कामाची सक्रियता वाढविली जाणार आहे . साताऱ्याचा घनकचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याचे नियोजन केले जाणार असून सातारकरांच्या कामांसाठी मी सतत केबिनमध्ये आणि प्रत्यक्ष फील्डवर सुद्धा काम करण्याचे नियोजन आहे .यापूर्वी सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापतिपदी काम केल्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनातील आपल्याला माहिती आहे. नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक अधिकारी यांना सोबत घेऊन आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.