सातारा शहराची झालेली हद्दवाढ व काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकामुळे यंदाच्या स्वीकृत नगरसेवक निवडीला बरेच राजकीय संदर्भ आहेत. हद्दवाढीत शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात सातारा विकास आघाडीने बांधणी सुरू केली आहे.
सातारा विकास आघाडीच्या वाट्याची दोन स्वीकृत नगरसेवकपदे असून एका पदावर आघाडीचे ऍड. दत्ता बनकर व दुसऱ्या पदावर प्रशांत आहेरराव सध्या आहेत. त्यातील d g बनकरांचे पद “ कायम असल्याचे’ मानले जात असल्याने आहेररावांच्या जागी संजय पाटील किंवा माजी शिक्षण सभापती वसंत शेठ जोशी यांची वर्णी लागण्याची शक्यता दाट असल्याचे बोलले जाते
अर्थात याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी अद्याप कोणताही संकेत दिलेला नाहीत; परंतु मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी आप्पा कोरे, सुनील कोळेकर यांच्या नावांची चर्चा आहे. नगर विकास आघाडीकडून अविनाश कदम यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते