पंतप्रधान मोदींची पहिली सभा उदयनराजे भोसले यांच्यासाठी होणार आहे.त्यामुळे राजेंची भाजपमध्ये पण जोरदार हवा आहे,अशी चर्चा सुरू आहे.गृहमंत्री अमित शहा राज्यात २० सभा घेणार आहेत.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास १०० सभा घेणार आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार आहेत.मोदी महाराष्ट्रात ९ सभा घेणार आहेत.दरम्यान या सभा शेवटच्या टप्प्यात असणार आहेत.मोदी आपल्या सभा २ ते ३ दिवस घेणार आहेत.