उपाध्यक्ष शेंडे यांनी केली राजपथ रस्त्याची पाहणी साविआचे नागरिकांकडून कौतुक

69
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार राजपथ या रस्त्याच्या कामाची उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व बांधकाम विभागाचे श्री भाऊसाहेब पाटील यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली या रस्त्यांचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या

साताऱ्यातील शाहू चौक ते राजवाडा हा मुख्य रस्ता या रस्त्याची दुरावस्था झाली होती याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला साताऱ्याची बाजारपेठ आहे सदरच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर चालू असून याची पाहणी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी बांधकाम विभागाचे श्री भाऊसाहेब पाटील यांच्यासोबत केली असून साताऱ्यातील मुख्य रस्ता हा कसा दर्जेदार होईल व तो वर्षानुवर्षे टिकला पाहिजे अशा सक्त सूचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या

सातारा विकास आघाडीच्या वतीने साताऱ्यातील राधिका रोड व राजपथ या रस्त्यांची कामे मार्गी लागल्याने साताऱ्यातील नागरिक सातारा विकास आघाडी व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कौतुक करत असून अशीच कामांची अपेक्षा नागरिकांनी सातारा विकास आघाडी व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडून केली आहे

Adv