स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सोनगाव डेपो येथील बायोमायनिंग निविदा त्याची दिलेली वर्क ऑर्डर ही रद्द करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे याची तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव आदी मान्यवरांकडेही केली आहे
सदरचा बायोमिनिंग प्रकल्प हा सातारकर नागरिकांच्या बोकांडी मारण्याचा प्रयत्न चालू असून या कामाचा प्राथमिक खर्च २ कोटी 90 लाख रुपये इतका होता मात्र तो आता जवळपास ६ कोटी 40 लाख 72 हजार रुपये एवढा केल्याने वरील तीन कोटी चा खर्च कोण करणार हे स्पष्ट केले नाही त्यामुळे तब्बल 3.5 कोटी चा बोजा सातारकर नागरिकांवर पडणार आहे बायोमायनिंग प्रकल्प करण्यासाठी नियमांचे पालन ही केलेली गेले नसून याची दिलेली वर्क ऑर्डर रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राजू गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे
सातारा पालिकेचे नगर अभियंता यांच्यावर दबाव आणून कार्यादेश देण्याबाबत आदेश देण्यात आला होता परंतु नगरअभियंता कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर तयारी दाखवली होती त्यामुळे बायोमिनिंग प्रकल्पाची फाईल आरोग्य विभागाकडे वर्ग करून सुपूर्द करण्यात आली सदरच्या वर्कऑर्डर मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यता उपलब्ध नाही तरी कार्यादेश कसे दिले गेले वास्तविक निविदा काढण्याच्या आधीच मान्यता घेणे बंधनकारक असते अशा अनेक त्रुटी या बायोमायनिंग मध्ये असून ही वर्क ऑर्डर तातडीने रद्द करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा हि राजु गोरे यांनी यावेळी दिला आहे