जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस जीवन प्राधिकरणाची शुद्ध पाणी पुरवठा करणारी फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीस सुमारे ३० पेक्षा अधिक तास लागणार असल्याने. तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून दि. ४ व ५ जून रोजीचा नियमित पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन असे सहा. कार्यकारी अभियंता चौगले यांनी केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जाहीर निवेदना द्वारे कळविण्यात आले आहे कि, दि. ४ जून रोजी सकाळी १० वाजता ग्रेड सेप्रेटर कामांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागील बाजूस ओढ़यामधे ४५० मिमी व्यासाची शुध्द जलदाब नलिका तुटली आहे. ती दुरुस्तीसाठी ३० तासापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यात वीज पुरवठा ही सतत खंडित होत आहे. यामुळे नियमित होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांचे मार्फत तातडीने पाईप दुरुस्ती काम सुरू केले आहे. सदरचे काम अत्यंत अडचणीचे ठिकाणी असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पुरवत होईल.
ग्राहकांना दि. ४ आणि ५ जून रोजी सदर बाजार, दौलत नगर, करंजे, शाहूपुरी, गोडोली, विसावा, कोडोली, खिंडवाडी, खेड इत्यादी संपूर्ण परिसरातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी उपलब्ध पाणी काटकसरीने वापर करून प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.