अजून त्यांच्यात सुधारणा झाली नाही का ? पालकमंत्र्यांचा गृहराज्यमंत्र्यांना टोला

93
Adv

देशासह राज्यात लँक डाऊन मुळे संचारबंदी जारी केली होती सर्वसामान्य माणसांनी नियमाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले मात्र सातारा शहरात पोवई नाक्यावरती गृह राज्यमंत्री यांच्याबरोबर जवळपास आठ ते दहा नागरिक बसलेले असतात यांच्यावर कोणतीही कारवाई चे धाडस पोलीस प्रशासनाने दाखवले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल याबाबत सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना विचारले असता ते म्हणाले अजून त्यांच्यात सुधारणा झाली नाही का असा टोला त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्र्यांना लावला

संपूर्ण सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पोवई नाक्यावरील आपल्या घराबाहेर रस्त्यावर ८ ते १० लोकांना जमवून बसत असल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले होते. त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत पुन्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना गृहराज्यमंत्री नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर बसतात असा प्रश्न विचारला. त्यावेळी अजून सुधारणा झाली नाही का असा प्रतिप्रश्न पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना केला. वर्तमान पत्रात बातमी वाचल्यानंतर सुधारणा झाली असेल असे मला वाटले. असा खोचक टोला देखील यावेळी बाळासाहेब पाटील यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना लगावला.

Adv