स्वराज्याची राजधानी साता-याची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी केली.या संस्थापकांचा राज्याभिषेक दिन अवघ्या महाराष्ट्रात सातारा स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. यंदापासून छत्रपती शाहू राज्याभिषकांच्या प्रत्येक दिनी म्हणजेच दिनांक १२जानेवारी रोजी, सातारा पालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्यता-याच्या राजसदरेवर घेण्याची घोषणा राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
दरम्यान कोणत्याही किल्यांवर विशेष सभा घेण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान राजधानी साता-याला मिळाला आहे या घोषणेच्या वेळी नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी प्रमुख उपस्थित होते.
साता-याच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने १२ जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. तर गेल्या आठ वर्षापासून सातारा स्वाभिमान दिन म्हणून या दिवसाचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला आहे.
सातारा शहराची हद्यवाढ झाल्या नंतर अजिंक्यतारा किल्ला शहराच्या हद्यीत आल्याने, अनेक तांत्रिक उणिवा आपोआपच
बाजुल्या झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या घोषणेला विशेष
महत्व आले आहे. यापुढे सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस
साजरा केला जाणार असल्याची घोषणा करताना उदयनराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने सातारा
ही स्वराज्याची राजधानी सजवली. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वांत मोठा राज्य विस्तार याच सातारा राजधानी वरुन
झाला.छत्रपती शाहु महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांची सावली आहे असे इतिहासात वर्णन झाले आहे. अखंड
हिंदूस्थान एकसंघ बांधण्याचे काम शाहु महाराज यांनी केले म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक दिन हा सातारा स्वाभिमान
दिन म्हणून साजरा होत आहे. या उत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस भव्य दिव्य करण्यासाठी आम्ही स्वतःलक्ष घालत
असल्याचे यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.