तब्बल चार महिने लॉक डाऊन मुळे लटकलेली स्थायी समितीची ऑनलाईन सभा वेबेक्स प्रणालीच्या तांत्रिक घोळात लटकली .विषय सभापती व सदस्यांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटू लागल्याने सुरळीत कामकाजाची अडचण झाली त्यामुळे सभा स्थगित करण्यात आली .
ही सभा आता शुक्रवारी दि 14 रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार आहे .लॉक डाऊन पूर्वीची शेवटची स्थायी समितीची शेवटची सभा 18 फेब्रुवारी 2020 रोजी झाली होती . त्यामुळे काही महत्वाचे दर मंजुरीचे विषय घेऊन त्यांला मान्यता देण्यासाठी तब्बल साडेसहा महिन्यानी वेबेक्स प्रणालीच्या माध्यमातून ऑन लाईन सभा घेण्याचे ठरले होते . अजेंडयावर तब्बल 114 विषय घेण्यात आले . नगराध्यक्ष माधवी कदम व प्रशासन अधिकाऱ्यांनी या सभेला सभागृहातून उपस्थिती नोंदवली . मात्र काही सभापतींना या तांत्रिक बाबीचा उलगडा न झाल्याने त्यांनी सभागृहात बैठक मारली मात्र ऑनलाईन बैठकीला हजर झालेल्या सभापतींचे आवाजाचे प्रतिध्वनी एकमेकांनाच ऐकायला यायला लागल्याने सभागृहात एकाच वेळी अनेक आवाजांचा कलकलाट सुरु झाला .
त्यामुळे सभेत नक्की काय चर्चा होतेय हे कोणालाच समजेना . शेवटी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी स्थायी समितीची आजची सभा स्थगित करून गुरुवारी सभा नेहमीच्या वेळेत घेण्याचे आदेश दिले .