राजें च्या पदयात्रांच्या धडाक्यामुळे सातारा शहर भाजपमय प्रचारात आघाडी

82
Adv

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात सुरु असलेल्या पदयात्रांच्या धडाक्यामुळे संपूर्ण सातारा शहर भाजपमय झाले आहे. भाजपने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून शहरात विरोधकांचा कुठेही मागमूस दिसेनासा झाला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या पदयात्रेत कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विजयी करण्याचा निर्धार करतानाच आमचे राजे बाबाराजे, आमचे राजे उदयनराजे, सातारकरांचा निर्धार पक्का.., अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि रांगोळी काढून त्यांचॆ उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. भाजपशिवाय विकास नाही त्यामुळे ‘हम भाजप के साथ, हम बाबाराजे के साथ’ अशी घोषणाबाजी युवकांनी यावेळी केली.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जनतेचा पाठिंबा फक्त भाजपाला मिळत असल्याने निवडणुकीपूरती उगवलेली भूछत्रे सैरभैर झाली आहेत. त्यांना काय करावं अन काय नको असं झालं आहे. गेल्या १० वर्षात काडीच काम केलं नाही ते माझ्या कामाबद्दल बोलत आहेत. मी काय विकासकामे केली हे सातारा- जावलीतील जनतेच्या समोर आहे त्यामुळेच जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनता माझ्यासोबत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचा पराभव अटळ आहे.

Adv