Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी कराडमध्ये महायुतीची बैठक; रवींद्र चव्हाण, छ उदयनराजे भोसले...

धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी कराडमध्ये महायुतीची बैठक; रवींद्र चव्हाण, छ उदयनराजे भोसले उपस्थित

297
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ कराड येथे महत्त्वपूर्ण बैठक सुरू होणार आहे.

या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच खासदार छ उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. महायुतीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असून निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे.

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी संघटनात्मक बांधणी, मतदारांशी संपर्क आणि प्रचाराच्या पुढील नियोजनावर या बैठकीत विशेष भर दिला जात असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे कराड येथील या बैठकीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त होणार असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक मानली जात आहे.

Adv