अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नियुक्ती पत्रावर मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांची फोटो असल्याने राष्ट्रवादी पक्षावर पाटील बंधूंचे वर्चस्व असल्याचे दिसून येते
फलटणचे लोकनियुक्त आमदार सचिन पाटील यांचा फोटो या पत्रावर नसल्याने पक्षाकडे आपला जाब विचारून आपला स्वाभिमान जागा ठेवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियुक्तीच्या नुकत्याच जाहीर मात्र या नियुक्ती पत्रावर ना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर,यांचे फोटो नसल्याने एका चर्चा रंगात आहे राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला की काय अशी चर्चा पक्षाचा रंगत आहे
ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चालत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले मात्र त्यांच्याच जिल्ह्यात काही नेत्यांकडून पक्षात वजाबाकीचे राजकारण चालू झाले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे
यापुढे चूक सुधारू..जिल्हाध्यक्ष
नियुक्तीपत्र वर झालेली चूक यापुढे सुधारू अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी बोलताना दिली