वेतन व करारनामा तातडीने करा अन्यथा वेगळा पवित्रा घेऊ

1438
Adv

नाबार्डसह अन्य शिखर संस्थांनी सातत्यपूर्ण नावाजलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या प्रगती मध्ये बॅन्केच्या सर्व कर्मचा-यांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेवून, कर्मचा-यांच्या पगारवाढीचा जरुर तो करारनामा तातडीने करावा, फिनॅकल सॉफटवेअरमूळे निर्मण होत असलेल्या तक्रारीबाबत योग्य उपाययोजना कराव्यात,अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असा सूचक परंत् गर्भित इशारा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी डिसीसी बँकेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाला दिला आाहे..

याबाबत खासदार तथा सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रनिवेदनात नमूद केले आहे की, बँन्केच्या यशस्वी वाटचालीत कर्मचा-यांचे फार मोठे योगदान आहे. बॅन्केच्या कर्मचा-यांच्या पगाराबाबतचा करारनाम्याची मुदत दिनांक 31/03/2024 रोजी संपलेली असुन, पगारवाढीसह पगाराबाबतच्या करारनाम्याचे नृतनीकरण गेल्या सुमारे 10-11 महिन्यांपासून रखडलेले आहे. बॅन्केच्या अमृतमहोत्सवी वर्षात कर्मचा-यांच्या पगाराबाबत करार न होणे ही निश्चितच बॅन्केच्या ख्यातीला नामुष्की आणणारी बाब आहे.बँकेवर आथिक बोजा पड़ेल म्हणून पगारवाढीचा करारनामा नुतनीकरण करण्यास चालढकल केली जात असेल तर अमृतमहोत्सवी वर्षाचा थाटामाटात केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या वेळी आर्थिक बोजाचे स्मरण राखता आले असते.
तसेच फिनॅकल सॉफटवेअरचा केलेला बदल व त्याबदलामुळे नव्याने करावयास लागलेली प्रंर्सची खरेदी तसेच अन्य काही बाबींवर होणारा अनावश्यक खर्च आर्थिक बोजा वाढवणारा आहे असे कधी का वाटले नाही हा खरा प्रश्न आहे. फिनॅकल सॉफटवेअर मुळे ग्राहक, आणि शेतकररी सभासद, तसेच बँन्क कर्मचारी यांच्याही मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. याचा विचार तातडीने होणे गरजेचे आहे.डिसीसी बॅन्किच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा, वेतनस्लॅब आणि वेतनवृध्दीसह जरुर तो करारनामा पूर्वीच होणे अपेक्षित होते. कर्मचा-यांना यापासून वंचित ठेवणे कोणत्याही सन्माननीय सभासद-संचालकाला मान्य होणार नाही.आर्थिक बोजाचे कोणतेही थोतांड न करता, त्यापेक्षा जिथे जिथे काटकसर करता येईल त्याठिकाणी अधिक सक्षमतेने खर्चबचत करुन कर्मचा-यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे.तथापि त्यासाठी कर्मचा-यांविषयी सकारात्मक
मानसिकताही असली पाहीजे.सबब,याबाबत तातडीने करारमान्याचे नुतनीकरण करण्यात येवून,कर्मचा-यांचा सेवा-त्याग आणि बॅन्केच्या प्रगतीमधील योगदान लक्षात घेवुन, सातारा डिसीसी बॅन्केतील कर्मचा-यांना भरघोस पगार वाढ करावी तसेच फिनॅकल सॉफटवेअर बाबतीतील तक्रारीवर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा आम्ही वेगळा पवित्त्रा घेतल्यास त्यास सर्वस्वी बॅन्केचे व्यवस्थापन आणि न्बँक प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

Adv