कोरोना संकटाने आता महाभयंकर रूप धारण केले आहे रोज साधारण नऊशे ते आठशे रुग्ण सातारा जिल्ह्यात नव्याने सापडत आहेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे शक्य होत नाही यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे या करता नवरंग ग्रुपने ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्या रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन मशीनची सेवा देण्याचे ठरवले असल्याचे नवरंग ग्रुपचे प्रशांत नावंधर यांनी सांगितले
स्वर्गीय श्री. मांगीलालजी व स्वर्गिय सौ.मोहिनीबाई नावंधर (नवरंग ग्रुप) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑक्सिजन मशिन गरजू पेशंटला विना मोबदला देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत नावंधर यांनी केले आहे दिपक नावंधर- ९४२२४०१५२७ अभय नावंधर -९८२२०३१०५०,प्रशांत नावंधर ९४२०४६३८४९ सुशांत नावंधर:९४२२०१११९२ मशिन घेऊन जाताना पेशंट व मशिन नेणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड आवश्यक असल्याचेही प्रशांत नावंधर यांनी यावेळी सांगितले
नवरंग ग्रुप कायमच सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतो येथून पुढेही कोरोना पेशंट अथवा गरजूंना काही मदत लागल्यास आवश्यक ती मदत करणार असल्याचे ही नवरंग ग्रुपचे प्रशांत नावंधर यांनी यावेळी सांगितले