उदयनराजे मित्र समुहामार्फत प्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप

61
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्ह्यातील पोलिस बांधवांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्या गोळ्या चे वाटप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे करण्यात आल्या

कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून भर उन्हात पोलीस बांधव हे आपले रक्षण करताना रस्त्यावरती दिसत आहेत पोलीस बांधवांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्या गोळ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह मार्फत उपलब्ध करून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्विनी सातपुते यांना आज प्रदान करण्यात आल्या यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर संग्राम बर्गे गणेश जाधव सुनील बर्गे अमोल तांगडे डॉक्टर प्रकाश इगावे डॉक्टर सचिन राजे हरिष पाटणे विनोद कुलकर्णी व मित्र समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते

डॉक्टर सचिन राजे यांच्या माध्यमातून ह्या गोळ्या उपलब्ध झाल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह नेहमीच सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असतो अजून जेवढी मदत करता येईल तेवढी पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिले

Adv