खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलुन, स्ट्रॉग मॅन
समजणा-यांचे पितळ उघडे पाडले. आपल्या धन्याचे पितळ उघडे पडत असल्याने शशिकांत शिंदे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा बोलवता धनी दुसरा कुणीतरी आहे अशी वेळ मारुन नेण्याची सोयीची परंतु पळपुटी भुमिका घेवून टिका करायची म्हणून केली आहे. सर्वसामान्य जनता आहे म्हणून आम्ही आहोत हे विचार उदयनराजे नेहमीच बोलून दाखवतात म्हणूनच, त्यांचा धनी दुसरा कोणी नसुन, सर्वसामान्य जनता आहे. तुम्ही आता तुमचे उघडे पडत चाललेले पितळ आणखी किती दिवस सोनं म्हणून दाखवत मराठा समाजाला भुलवणार१, मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास कुणी विरोध केला, मराठा आरक्षणाचा प्रश्न ४० वर्षे कुणी भिजत ठेवला आदी प्रश्नांचा पहिल्यांदा खुलासा करा असे सडेतोड सवाल मराठा क्रांति मोर्चाचे जिल्हा प्रमुखसमन्वयक व याचिकाकर्ते
संदिप पोळ, विवेक कु-हाडे, तसेच वैभव शिंदे, यांनी केले.
तीन-चार दिवसापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी साता-यात पत्रकार परिषद घेवून, वस्तुस्थिती मांडली होती.
त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी मंडल आयोगावेळी मराठा समाजावर अन्याय केला गेला असे नमुद करत, मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम त्या मराठा नेत्यांनीच केल्याचे म्हटले होते. त्यानंतर मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी सुध्दा मंडल आयोगाच्यावेळी मराठा समाजाचा समावेश करणेबाबत स्व.वसंतदादा पाटील यांनी सहकार्य केले परंतु शरद पवार यांनी विरोधी भुमिका घेतली, तसेच मराठा आरक्षणाबाबत शरद पवार मौन पाळुन होते असे सांगुन, उदयनराजे यांच्या वक्तव्याला पुष्टीच दिली होती,त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत पवार यांचा बोलवता धनी दुसराच असल्याची टिका केली म्हणून मराठा क्रांति मोर्चाचे जिल्हासमन्वयक आणि पदाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, उदयनराजे कोण आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा धनी कोणी असु शकेल असे
स्वप्नात सुध्दा कोणाला वाटणार नाही.ओठात एक आणि पोटात एक असे उदयनराजेंची उभ्या आयुष्यात कधीही केलेले नाही. मुह मे राम आणि बगलमे खंजीर असं सुध्दा त्यांचं काही नाही. जे असते ते थेट. जे मनात आहे,खरं आहे ते उदयनराजे बोलणारच हे उदयनराजेंचे वैशिष्ठय आहे. ते कोणाची भिडभाड ठेवत नाहीत, परखडपणे बोलताना ते कोणत्याही पक्षाची चौकट मान नाहीत हे महाराष्ट्राने आजवर अनुभवले आहे. शशिकांत शिंदे यांनी पळपुटया सोयीची टिका केल्याचे म्हणनूच बाटते.कदाचित ते भांबावले असावते. समाजाची चीड त्यादिवशी उदयनराजेंनी व्यक्त केली.मात्र ही चीड शशिकांत शिंदे यांच्या धन्याच्या सोयीची नाही. उदयनराजेंनी आ.शशिकांत शिंदे यांच्या धन्याचे पितळ उघडे पाडल्याने मराठा आरक्षणाला खरा अडथळा कोणाचा आहे हे सुध्दा लोकांना समजलं.म्हणूनच समाजाचे लक्ष विचलित करुन त्यांना भरकटवण्यासाठी आमदार शशिकांत शिद हे
कोणताही आधार नसलेली विधाने करीत आहेत. मराठा आरक्षण म्हणजे काय? हेच शशिकांत शिंदे यांना अजुन समजलेले नाही.गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे तरी शशिकांत शिंदे म्हणतात की, मुक मोर्चापासून मराठा आरक्षणाला सुरुवात झाली. यावरुनच त्यांना काहीच माहिती नाही आणि त्यांना आपल्या समाज,मुलांबाबत किती तळमळ आहे हे देखिल स्पष्ट होते. त्यांच्या धन्याने केवळ आपल्या व्यक्तीगत आणि राजकिय स्वार्थासाठी मराठा समाजाला जाणिवपूर्वक डावलले हे उघड असेलेले गुपित उदयनराजेंच्या नेमक्या प्रश्नांमुळे बाहेर यायला लागल्याने,
आरक्षणाचा मुळ विषय भलतीकडे नेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. परंतु आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षात
ठेवावे की, राजकिय फायदयासाठी तुम्ही मराठा समाजाचा बळी दिला आहे व देत आहात.
उद्या तुमचीच मुले तुम्हाला जाब विचारतील तेव्हा फार उशीर झाला असेल,मराठा तरुण तुमच्या राजकिय चाली ओहखून आहे तोतुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मराठा क्रांति मोर्चाचे पदाधिकारी यांनी दिला आहे.