कास धरणाचे रखडलेले काम लवकरच होणार सुरु आ. शिवेंद्रसिंहराजे वाढीव ५८ कोटी निधी झाला मंजूर

97
Adv

वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब‘ेक लागला होता. ज्या ना. अजित पवारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी काही दिवसांपुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी देण्याचे जाहिर केले होते

. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे ना. अजित पवार यांनी आज कास धरण प्रकल्पासाठीच्या वाढीव ५८ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर करुन दिला. यामुळे बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी कास धरणाची उंची वाढवण्याचे निधी अभावी थांबलेले काम आता लवकरच पुन्हा सुरु होईल आणि हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

सातारा शहरासह आसपासच्या १५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कॉंग‘ेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधीला मान्यता देण्यात आली होती परंतु या निधीला राज्याच्या वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता.

सोमवारी मंत्रालयात ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग‘क‘म समितीची बैठक झाली. या बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह पाणीपुराठा विभागाचे अप्पर मु‘य सचिव डॉ. संजय चहांदे, सह सचिव हजारी, वित्त विभागाचे सचिव मित्तल, सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिङ्ग मोमीन, सातारा पालिकेचे मु‘याधिकारी अभिजित बापट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता प‘वी चौगुले, उपविभागीय अभियंता जी. आर. कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत झाला असून या रस्त्यावरील नवीन पुलालाही निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग‘ही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. ना. अजित पवार यांनी तत्काळ वित्त विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना देवून नवीन पुलासाठी २.७८ कोटी निधी आणि पुलासाठीचा निधी धरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी रुपये निधीस मान्यता देण्याच्या सुचना अधिकार्‍यांना केल्या. ना. पवार यांच्या सुचनेनुसार वित्त विभागाने तत्काळ ५८ कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लाणार असून याबाबत सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.  
चौकट—–
शाहूपूरीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी मंजूर
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काही वर्षांपुर्वी शाहूपूरी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ३१.३१ कोटी निधी मंजूर करुन घेतला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनी, वन विभागचा खर्च यामध्ये धरण्यात आला नव्हता. तसेच उर्वरीत पाईपलाईनचे काम यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांना शाहुपूरी येथील सुधारीत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी देवून १२ कोटी रुपये निधी मंजूर करावा अशी मागणी केली. त्यालाही ना. पवार यांनी होकार दिला त्यामुळे शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेसाठीही वाढीव १२ कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्याने ही योजनाही लवकरच मार्गी लागणार असून शाहुपूरीकरांचा पाणीप्रश्‍नही कायमस्वरुपी सुटणार आहे. हे वृत्त समजताच शाहुपूरीवासीयांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.    

Adv