कोरोनो सारखे वैश्विक संकट आणि गेले काही महिन्यांचा लॉकडाउन मुले निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या माण तालुक्यातील सर्वसामान्य लोकांवर गेले काही दिवस अस्मानी आर्थिक संकट उभे आहे.
अशातच रमाई आवाज योजने सह इतर घरकुल योजनाचे सन2018 2019 २०१९ – २० मधील मंजूर लाभार्थी यांचे पैकी काही घरकुल लाभार्थी यांचे घरकुलाचे कामे चालू आहेत तर काहींनी उसनवारी करून ती कामे पूर्णत्वास नेली आहेत.
परंतु गेले अनेक दिवस शासन दरबारी घरकुलांचे अनुदान न मिळाल्यामुळे सर्वसामान्य घरकुल लाभार्थी यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असून लाभार्थी विवंचनेत आहेत . घरकुल साठी लागणारे साहित्य उधार घेतलेने उधारी करिता अनेक दुकानदार तगादा लावत आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थी यांची थकीत बिले तात्काळ अदा करणेत यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी सहायक गटविकास अधिकारी माण भरत चौगुले यांनी निवेदन देऊन केली यावर हा निधी राज्य शासन स्तरावर वितरित होत असून निधी मागणी करिता जिल्हा परिषद सातारा यांचेकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली असून एका महिन्यात निधी वितरित केला जाईल असे आश्वासन सहा.गट विकास अधिकारी भरत चौगुले यांनी दिले आहे.