कन्हेर योजनेचे श्रेय हे फक्त उदयनराजेंना काळभैरवनाथ पॅनलचा दावा

90
Adv

कन्हेर योजनेचे श्रेय हे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना असल्याचा दावा शाहूपुरी येथील काळभैरवनाथ पॅनल च्या वतीने करण्यात आला आहे ग्रामपंचायत व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्फत मंत्रालयात याबाबत वारंवार बैठका व पाठपुरावा केला असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी दिली

शाहूपुरी ता.सातारा येथे होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या कायमची मिटवण्यासाठी कण्हेर धरणातून स्वतंत्र उद्भव असलेली नवीन पाणीपुरवठा योजना शासनामार्फत सन 2014 मध्ये मंजूर करण्यात आली होती. परंतु जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराने या योजनेसाठी पाईपलाइन कमी पडलेली होती. तसेच कण्हेर येथील लोडशेडिंगमुळे आवश्यक तेवढे पंपिंग होऊ शकत नव्हते. यामुळे हि पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास असतानादेखील ठप्प झाली होती. या योजनेस लागणारी पाईपलाईन व एम. एस.ई.बी.या सर्व बाबींसाठी वाढीव निधीची आवश्यकता होती. याबाबत शाहूपुरीतील सत्तारुढ *श्री काळभैरव पॅनलने* वाढीव योजना मंजूर करण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व*माजी उपसभापती संजय पाटील* यांच्या मार्गदर्शनातून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी योजनेच्या वाढीव निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा योजनेस शासनाकडून वाढीव निधी मंजूर होऊन युवा नेते संजय पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.

शाहूपुरी वासियांचा जिव्हाळ्याचा असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच पाटील यांनी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठ्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Adv