1 लाख 86 हजारचा बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशन कडून दोघांना अटक

57
Adv

1 लाख 86 हजार गुटखा विक्री प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विशाल वायकर संदीप शितोळे हसन तडवी लैलेश फडतरे अमित माने स्वप्नील कुंभार ओंकार यादव मोहन पवार यांनी ही कारवाई केली

याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की तांदुळ आळी ते देवी चौक येथे एका अल्टो कार मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आलेला पानमसाला सुगंधित गुटखा व अन्य माल विक्रीस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलीस सदर ठिकाणी सापळा लावून बसले होते दुपारी अडीच्या सुमारास ही कार तांदूळ येथे आली असता त्या गाडीची तपासणी केल्यानंतर गाडी मध्ये एक लाख 86 हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे

सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलिस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना काही दिवसांपूर्वी अवैद्य गुटका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदरच्या कारवाईने बरेच जणांचे धाबे दणाणले आहेत

Adv