जिल्हा बॅंकांच्या निवडणुका आता तीन महिन्यानंतर. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

36
Adv

कर्जमाफी योजनेच्या अमंलबजावणीत अडचणी येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या सहकारी बॅंका व कृषी सहकारी पतसंस्था वगळून उर्वरित सहकारी बॅंका व सोसायट्यांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितली

संचालक मंडळाची निवडणुक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजनेत विलंब होण्याची शक्‍यता आहे. तसेच झाल्यास कर्जमाफी योजनेत बाधा येऊन पुढील खरिप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास पात्र करण्यात बाधा येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले

त्यामुळे ज्या संस्थांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी बॅंका व विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका शासनाने तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या संस्थांच्या संचालकांना तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. आता तीन महिन्यांनी पुन्हा निवडणुकीची सर्व प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

Adv