गडचिरोली सारख्या दुर्गम भागात काम करताना अनेक आव्हाने होती . मात्र त्या तुलनेने भौगोलिक विषमता असणारा सातारा जिल्हा पर्यावरण दृष्टया समृध्द आहे . सातारा जिल्ह्याची माहिती मी सातत्याने मिळवत आहे . जिल्हयाचे प्रश्न समजून घेतल्यावरच माझ्या कामाला सुरवात होणार आहे अशी ग्वाही साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिली .
या कामासाठी मला किमान दोन महिने लागतील असे त्यांनी सांगितले .नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता पदभार स्वीकारला . प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी आर .एस. शिंदे, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले . सिंग यांनी पहिल्या च भेटीत अगदी थोडक्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला . कामाची सुरवात कशी करणार ? या पहिल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ज्यादा हवामें बंदू के ताननां अच्छा नही . साताऱ्या विषयी मी सातत्याने माझे काही वरिष्ठ व बॅचमेटस कडून मी माहिती घेत आहे . पर्यावरणाच्या दृष्टीने सातारा प्रचंड समृध्द आहे . पूर्वेचा दुष्काळ व पश्चिमेची अतिवृष्टी ही जिल्ह्याची वैशिष्टये आहेत . गडचिरोली सारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्हयात विकासाचे प्रश्न गंभीर आहेत .2010 व 2019 चा अपवाद वगळता तेथे नक्षलवादाचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे .विकासाचे अनेक प्रश्न तेथे यशस्वीपणे मार्गी लावले . गडचिरोली जिल्ह्यात राईस मिल मोठया प्रमाणावर आहे . तेथे पीपीपी तत्वावर रकताल्पता असणाऱ्या आदिवासी स्त्रियासाठी तांदळाच्या पौष्टिक पदार्थाची आहार योजना सुरू केली . हा प्रकल्प भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरल्याचे सिंग यांनी सांगितले .
साताऱ्याचे प्रश्न खूप आहेत . आजच मी पदभार स्वीकारला आहे . साताऱ्याचे प्रश्न मी येत्या तीन महिन्यात समजाऊन घेणार आहे . प्रशासनातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रलंबित कामाचा निपटारा टप्पाटप्प्याने सुरू करणार असल्याचे शेखर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .