खा श्री छ उदयनराजे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे होणार उद्घाटन

71
Adv

करोना महामारीमुळे सातारा शहराच्या विकासाला आलेली मरगळं झटकण्याची तयारी सातारा विकास आघाडीने केली आहे . दि23 रोजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे नारळं फुटणार आहेत .

सातारा विकास आघाडीने विकास कामांच्या निमित्ताने राजकीय पेरणी सुरू केल्याची चर्चा आहे . सातारा शहराची हद्दवाढ झाल्यापासून शहरात रखडून पडलेली विकासकामे अग्रक्रमाने पूर्ण करून हद्दवाढीत नव्याने आलेल्या भागासाठी निधीचा पाठपुरावा करणे यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना नियोजन करावे लागणार आहे .करोनाची वाढती महामारी व त्याकरिता सव्वा कोटी रूपये खर्चाचा पडलेला बोजा यामुळे सातारा पालिकेचे आर्थिक गणित पूर्णत : कोलमडून पडले आहे . राज्य शासनाच्या अनुदान योजनेवरच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत . नव्या विकास कामांना मर्यादा पडल्याने सर्वच नगरसेवकांचा राजकीय उत्साहं मावळला .

अकरा महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकांची राजकीय मोर्चेबांधणी लक्षात घेऊन जनसंपर्क व विकासकामे हा कानमंत्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या बावीस शिलेदारांना दिला आहे . दलितेतर विकास अनुदान योजनेअंतर्गत राधिका रोड , राजपथ व जिल्हा परिषद कॉर्नर ते जरंडेश्वर नाका या रस्त्यांचे डांबरीकरण, कर्मवीर कॉलनी राधिका रोड येथे मल्टिपर्पज हॉलचे भूमीपूजन, भुयारी गटार योजनेचा पुन्हा आढावा , सोनगाव कचरा डेपोच्या सुविधांचे मजबूती करण अशा विविध कामांची उदघाटने दि 23 ऑक्टोबर रोजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन सातारा विकास आघाडीने केले आहे . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत त्यातील ग्रेड सेपरेपरेटरचे काम अंतिम टप्प्यात आहे . .

खा श्री छ उदयनराजेंची . राजकीय झप्पी ही साताऱ्याच्या राजकारणात चर्चेची असते त्यांची झलक या विकास कामांच्या उदघाटनात दिसणार हे नक्की .

Adv