अजिंक्यतार्यावरून उडी मारूनआत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून सातार्यातील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या चोवीस तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यावर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील लोक चिंतेत पडले आहेत.
, साताऱ्यातील शनिवार पेठ परिसरात राहणारा तेवीस वर्षीय युवक हा रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. जाताने त्याने मित्राच्या मोबाईलवर ‘मी अजिंक्यताऱ्यावरून आत्महत्या करतोय. कोणालाही जबाबदार धरू नये,’ हा मेसेज वाठविला. मित्राला हा मेसेज त्याच्या वडिलांना दाखविला. त्यावेळी हा मेसेज पाहून वडील अशक्षरश: हादरून गेले.
वडिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि पेठेतील नगरसेवक अमोल मोहिते, जर्नादन जगदाळे, यांच्यासह वीस ते पंचवीस युवक तातडीने अजिंक्यताऱ्यावर पोहोचले. अजिंक्यताऱ्याच्या चारीबाजूने त्यांनी शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.