सातारा शहराच्या आरोग्याचे नियोजन करण्यासाठी व सोशल डिन्स्टसिंग चा प्रसार करण्यासाठी आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी पुढाकार घेतला आहे . शहराच्या निर्जंतुकीकरणासह स्वच्छता मोहिम व होम टू होम सर्वेच्या नियोजनावर आरोग्य सभापतींनी बारकाईने लक्ष ठेवले आहे .
आरोग्य विभागाच्या नियोजनाची सूक्ष्म आखणी करत आरोग्य सभापतीनी कामाची आखणी व अहवाल यावर भर दिला आहे . प्रभाग क्रं १ ते २० मध्ये जंतुनाशक फवारणी व स्मोक फॉगिंग सुरू आहे . दि 22 मार्च पासून गेल्या दोन आठवड्यात 52 हजार लीटर जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली .
उपमुख्याधिकारी संचित धुमाळ व आरोग्य निरीक्षक यांच्याशी अनिता घोरपडे यांनी सातत्याने समन्वय ठेवत शहराचा कोणता कोपरा फवारणी पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली . तसेच त्रिशंकू भागातही धूर व जंतुनाशक फवारणी करण्याचा आग्रह त्यांनी धरला .
नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह शहराचा प्रत्येक प्रभाग पिंजून काढत प्रत्येक वॉर्डात सभापतींनी सोशल डिस्टन्सिंग चा संदेश दिला . प्रत्येक घंटागाडीवर करोना प्रतिबंधाचा प्रबोधनात्मक संदेश प्रसारीत केला आहे . आरोग्य सभापतींनी जनजागृती करिता सातारा स्वच्छ राखण्याच्या जिंगल्स बनवून घेतल्या .
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक अशोक घोरपडे यांचा कामाचा झपाटा लक्षात घेऊन फार पूर्वीच कामासाठी वाव असणाऱ्या शहराच्या आरोग्य विभागाची जवाबदारी अनिता घोरपडे यांच्याकडे देण्यात आली .
नागरिकांच्या समस्या समजाऊन घेत शहराच्या कानाकोपऱ्यात कम्युनिटी ङस्ट बिन चे सभापतींनी नियोजन केले . याशिवाय पुढील पावसाळ्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील ओढे व नाले यांच्या सफाईचे नियोजन व बैठकांचे सत्र सुरू झाले आहे . स्थायी समितीच्या तांत्रिक मंजुरीची केवळ आवश्यकता उरली आहे . करोनाच्या जीवघेण्या संक्रमणाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी आरोग्य सभापती कमरेला पदर खोचून मैदानात उतरल्या आहेत .