मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फि सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषत: ज्या दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे
मराठा समाजासाठी खालील योजना त्वरित लागू करा…
1. प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी.
2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यानां ‘स्वयं’ योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा.
3.गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा.
4. ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.
5.सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १००० कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा.
6.बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या.
7. मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसह इतर परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या.
8.मराठा समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून द्यावी.
9.ग्रामीण भागातील शेतकऱ्यानां शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती आणि शेतकरी कुटूंबास विमा संरक्षण द्यावे.
10. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून ठोस कृती करावी. अन्यथा मराठा सामाजाच्या रोषाला सामोरे जावे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत वरील मागण्यांसह इतर समाजाप्रमाणे मराठ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करून त्यानां छोट्या उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बेरोजगार तरूण-तरूणीनां भत्ता सुरू करावा.