सातारा पालिकेच्या जलतरण तलावाचा साडेतीन कोटीचा प्रस्ताव
भाजप गटनेत्या सिध्दी पवार यांची माहिती
अटल स्मृती उद्यानासाठी दोन कोटी ची मागणी
सातारा दि 28 ( प्रतिनिधी )
गेल्या पाच वर्षापासून बंद पडलेल्या सातारा पालिकेच्या जलतरणं तलावाला नवीन झळाळी मिळणार आहे . या तलावाच्या अद्ययावती करणासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये तर वैशिष्टयपूर्ण अनुदान योजनेतून भवानी पेठ सि.स. नं 8 येथील 46 गुंठे जागेवर अटल स्मृती उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आल्याची माहिती भाजपच्या गटनेत्या सिध्दी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली
या दोन्ही कामांसाठी राज्य शासनाकडून प्रत्येकी पन्नास लाख रूपये मिळणार असून सातारा पालिकेच्या बजेटमध्ये सुध्दा पन्नास लाखाची तरतूद करण्यात आल्याचे सिध्दी पवार यांनी स्पष्ट केले .
त्या पुढे म्हणाल्या युनियन क्लबच्या पिछाडीची जागा व सातारा पालिकेचा जलतरण तलाव या दोन्ही विकास कामांच्या पूर्ततेसाठी 2017 पासून माझा पाठपुरावा सुरू आहे . तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन्ही कामाचे आराखडे मांडून मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केला .मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या या प्रकल्पा करिता पालिकेने आर्थिक तरतूद करावी असे पत्र घेऊन तशी मागणी केली . माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा जलतरण तलाव व अटल स्मृती उद्यान या साडेपाच कोटीच्या प्रस्तावासाठी पन्नास लाख रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले .
सातारा जलतरण तलाव हा अद्ययावत सुविधांचा असणार आहे . जागेच्या मर्यादेमुळे आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांच्याशी चर्चा करून अद्ययावत फिल्टरेशन प्लँट, बाथ सिस्टिम, स्त्री -पुरुष स्वतंत्र चेंजिंग रूम, जलतरण तलावाला टाईल्स, इतर अद्ययावतीकरण इं कामे केली जाणार आहे . नगरोत्थान योजनेअंतर्गत हा तब्बल साडेतीन कोटीचा प्रस्ताव असून त्याला पहिल्या टप्प्यात पन्नास लाख रुपये मिळणार आहेत .
युनियन क्लब येथील सि.स.नं. 8 येथील 46 गुंठे जागेवर अटलं स्मृती उद्यान उभारण्यात येणार असून हे थीम पार्क असणार आहे . वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे . ही जागा सातारकरांच्या उपयोगात यावी याकरिता सातत्याने माझा पाठपुरावा सुरू होता . शहराच्या पश्चिम भागात उत्तम विसाव्याचे ठिकाणं व जॉगिंग पार्क म्हणून ही
जागा विकासित करण्याचे नियोजनं आहे . हा बगीचा नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारीत असणार आहे असे पवार यांनी सांगितले .
प्रतिक्रिया – सातारा जलतरण तलाव व अटलं स्मृती उद्यानाच्या कामांचा पाठपुरावा करताना प्रचंड संघर्ष करावा लागला . या कामाच्या पाठपुराव्यात माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, स्वीकृत नगरसेवक अॅड दत्ता बनकर यांचे मोठे सहकार्य मिळाले . प्रभाग क्रं 17 मध्ये तब्बल 80 लाख रुपयांचे रस्ते झाले . मात्र अतिउत्साही अतिराजकारणी लोकांना मी सांगू इच्छिते की कामात खो घालणे सोपे असते . मात्र लोकांचा आशिर्वाद व मार्गदर्शन यामध्ये मोठी ताकत असते . या दोन्ही प्रकल्पांचा शुभारंभ वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत केला जाणार असून साताऱ्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे .