यापुढेही मोठ्या हिररीने काम करणार.. सुनील काटकर

113
Adv

माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा विचार,भारतीय जनता पार्टी सारख्या जगामध्ये बलाढय असलेल्या पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदा साठी करण्यात आला, पक्षश्रेष्ठींनीही एका कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेतली तसेच एकंदरीतच भाजपा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत मला लाभलेले सर्वांचे सहकार्य आणि सातारा जिल्हयातील आजी माजी लाकप्रतिनिधीं अनेक धुरीणींनी माझ्या नावाच्या केलेल्या सकारात्मक शिफारशी या सर्व आत्मिक बळ देणा-या घटना बाबींविषयी मी स्वत:अत्यंत समाधानी आहे.

पक्षाच्या ध्येय्यधोरणे आणि दूरगामी परिणामकारक वाटचाल याचा विचार करुन,भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून क-हाड दक्षिणचे संयम आणि धडाडी याचा संगम असलेले विदयमान आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांची निवड केली याचेही मी मनापासून स्वागत करतो तसेच या निवडीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

सातारा लोकसभा निवडणुकीकरीता संयोजक म्हणून आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा समन्वयक म्हणून काम करताना पक्षाचे वरिष्ठ, सामान्य नव्या-जुन्या कार्यकर्त्यांसह अनेकांचा जवळुन संपर्क आला,अनेक चांगले अनुभव गाठीशी बांधता आले या सर्वांचा परिपाक म्हणून पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत मला स्थान मिळाले अशी माझी धारणा आहे आणि त्याबाबत मी कृतज्ञ आहे.

येणा-या पुढील काळात पक्षाच्या ध्येय्य धोरणाशी सुसंगत ठरेल आणि भाजपा पक्ष जी जबाबदारी सोपवेल ते समाजकार्य आमचे नेते आणि सातारा जिल्हयाचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शना नुसार अविरतपणे आणि हिरीरीने केले जाईल याचीही आजच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभुमीवर ग्वाही देतो.

भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष आमदार मा.डॉ. अतुल भोसले यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीस अनेकानेक शुभेच्छा आणि भाजपा पक्ष श्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

Adv