भाजपला आमदार अतुल बाबांच्या रूपाने मिळाला युवा जिल्हाध्यक्ष

74
Adv

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे खचलेले धैर्य आणण्याचे काम नूतन जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांना करावे लागणार आहे अतुल बाबा यांना राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष पदाचा चांगला अनुभव असून त्या राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचाही फायदा होणार आहे

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी आज जाहीर झाल्या यामध्ये सातारा भाजप जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली ती आमदार अतुल भोसले यांची गेल्या काही वर्षात भाजप पदाधिकाऱ्यांचे धैर्य खचलेले होते हे धैर्य पुन्हा आणण्यासाठी अतुल बाबांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत

तत्कालीन जिल्हाध्यक्षांच्या गच्छंतीने भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात दिवाळी साजरी झाली बरं झालं सातारा जिल्ह्याला नवीन जिल्हाध्यक्ष मिळाले अशीच भावना काही पदाधिकाऱ्यांनी खाजगीत बोलताना व्यक्त केली

नूतन जिल्हाध्यक्ष अतुल बाबांना शुभेच्छा देण्यासाठी काही मान्यवर पत्रकार यांनी फोन केले मात्र फोन उचलला गेला नसल्याने अतुल बाबा फोनवर संपर्कात राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे

Adv