राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर आहे याचा निर्णय घेतला होता मात्र आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रामराजे नाईक निंबाळकर प्रमुख उपस्थित होते
गेल्या आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षात दोन गट पडले यामधून उपमुख्यमंत्री यांच्यासह आठ मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकार बरोबर जाऊन शपथविधी संपन्न केला मात्र सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे बरोबर असल्याचे त्यांनी जाहीर केले होते पवार साहेबांच्या कराड सातार दौऱ्यात ही मकरंद आबा केंद्रस्थानी होते मात्र वाई तालुक्यातून आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबरोबर जाण्याचा जोर धरला होता कार्यकर्त्यांचे व कारखान्याच्या हितासाठी आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ द्यायची ठरवले असल्याचे समजते
आमदार मकरंद पाटील यांच्या बरोबर अमित कदम शशिकांत पिसाळ बाळासाहेब सोळसकर आधी जिल्ह्यातील मान्यवरानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे